Image
आमच्या बद्दल

मुंबई शहर हे कापड गिरण्यांचे बालेकिल्ला असलेले शहर म्हणून ओळखले जाते. ह्याच मुंबईमध्ये चिंचपोकळी, लालबाग ,परळ व शिवडी हे विभाग जास्त करून कोकणातून आलेल्या मराठी मध्यमवर्गीय लोकांच्या वस्तीचा विभाग म्हणून ओळखला जातो.

स्वराज्य निर्मितीची चळवळ ही उत्सव माध्यमातून करून सर्व लोकांना एकजूट करण्याच्या विचारातून ज्यांनी केली अश्या श्री लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रेरणेने चिंचपोकळी विभागात एका सर्वात जुन्या व मानाच्या अश्या मंडळाची १९२० साली स्थापना करण्यात आली आणि ते मंडळ म्हणजे सर्वत्र महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले "चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ,मुंबई".

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे यंदा १०५ वे वर्ष असून सार्वजनिक उत्सव मंडळामध्ये सर्वात मोठा विभाग लाभलेले मंडळ आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाला ५००० वर्गणीदार आहेत, तसेच या मंडळास १२ पदाधिकारी , १०४ कार्यकारणी सदस्य व १५०० - २००० सहाय्यक सदस्य आहेत.या सर्वांच्या एकजूट व परिश्रमातून हे मंडळ आज नावारूपास आलेले आहे.

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ हे श्री चिंतामणी व आई भवानीच्या कृपेने वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रात उत्सवाच्या माध्यमातून उपक्रम राबवून सामाजिक जीवन व शैक्षणिक क्षेत्रात व आरोग्य विषयक कामात हातभार लावत आलेले आहे. आज या मंडळाचे गणेशोत्सव, नवरात्रौत्सव , आरोग्य चिकित्सा केंद, राष्ट्रीय उत्सव, संधर्भ पुस्तक पेढी व किलबिल नर्सरी असे बरेचसे उपक्रम आहेत.

"चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ, मुंबई" हे श्री चिंतामणी व आईभवानीच्या कृपेने गेली अनेक दशके सामाजिक बांधिलकी जपून आपल्या कार्याचा सर्वत्र ठसा उमटवत असून व या पुढे देखील असेच कार्य करून सर्वांच्या सेवेसाठी कायम वर्षानुवर्षे असेच तत्पर राहील.