गणेशोत्सव



Image

गणेशोत्सव


श्री चिंतामणीचा पाटपूजन सोहळा मंगलमय वातावरणात शनिवार दि. १५ जुलै २०२३ रोजी चिंतामणी सभामंडपात पार पडला. त्यानंतर श्री चिंतामणीचा आगमन सोहळा ढोल ताशांच्या गजरात व भक्तिमय वातावरणात शनिवार दि. ९ सप्टेंबर २०२३ रोजी संपन्न झाला.

मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल सुभद्रा अर्जुन आजगांवकर यांच्या हस्ते व श्री दत्तात्रय शास्त्री यांच्या पौराहित्याखाली श्री चिंतामणीची प्रतिष्ठापना करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे "श्री महाभिषेक" व "श्री सत्यनारायणाची महापूजा" आयोजित करण्यात येऊन पूजेचा प्रसाद घरोघरी देण्यात आला.

मूर्तिकार स्व. विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू यांनी सुबक मूर्ती घडविली. त्यास नेत्रदीपक सजावट श्री राहुल परब, वेशभूषा श्री प्रकाश लहाने व प्रकाश योजना श्री विशाल शेलार यांनी केली.

तसेच मंडप-दिवाबत्ती श्री चंद्रकांत बापते, छपाई सौ संगीता कडव व बॅनर श्री प्रदिप राणे यांनी केले. भाविकांना चिंतामणीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी प्रथमच रेलिंग सहित पूल श्री सुनील चाळके यांनी उभारला.


श्री.अवधूत हेमबार्डे यांच्या सौजन्याने श्री चिंतामणीचे फोटो सेशन पार पडले. तसेच उत्सव/उपक्रम कालावधीत छायाचित्रकार म्हणून श्री अमर जाधव यांनी काम पहिले. गणेशोत्सवाच्या कालावधीतमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या कार्याची प्रशंसा केली. श्री नूतन बाबदेव मित्र मंडळ, बकरीअड्डा या मंडळाकडून रोज सायंकाळी श्री चिंतामणी चरणी आरतीची सेवा रुजू करण्यात आली.

प्रथमच मंडळाच्या वतीने चिंतामणी भक्तांसाठी "आयडियल एंटरप्रायजेस" च्या सहकार्याने प्रसाद विक्री करण्यात आली. उत्सव कालावधीत पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आरतीच्या तालावर व ढोलताशांच्या गजरात गिरगाव चौपाटीवर श्री गणरायाला पुढच्यावर्षी वर्षी लवकर येण्याचे सांगून जड अंतकरणाने निरोप देण्यात आला.