लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त रविवार दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बा. य. ल. नायर रुग्णालय, टाटा रुग्णालय, जे. जे. महानगर रुग्णालय, वाडिया रुग्णालय व के.ई.एम रुग्णालय या रक्तपेढ्यांच्या सहकार्याने करण्यात आले. रक्तदान शिबिरात ७४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आली आणि सर्व रुग्णलयांच्या डॉक्टर्स, सहकारी व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
• श्रीमती एस.आर.मेहता आणि सर के.पी. कार्डियाक इन्स्टिटयूट संचालित मनुभाई शहा वैद्यकीय आणि संशोधन केंद्र (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीर रविवार दि. २९ ऑक्टोबर २०२३ रोजी चिंतामणी सभामंडपामध्ये राबविण्यात आले. या उपक्रमा अंतर्गत आरोग्य विषयक ९ विविध तपासण्या करण्यात आल्या. संस्थेच्या डॉक्टर्स, सहकारी व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला.
• स्वस्तिक फाउंडेशन ही संस्था उपेक्षित गरीब, गरजू, अपंग लोकांकरिता कार्य करणारी कोकणातील अग्रेसर संस्था आहे. या संस्थेचा उपक्रम असणाऱ्या दिविजा वृद्धाश्रमातील ४७ निराधार आजी/आजोबांच्या उपचारात्मक पुनर्वसनासाठी वृद्धाश्रमाला मंडळातर्फे जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या.
• जीवन आनंद संस्था हि रस्त्यावरील निराधार बांधवांसाठी कार्यरत आहे. या संस्थेने आज पर्यंत ४५० बांधवांचे पुनर्वसन केले आहे. या संस्थेच्या संचालित समर्थ आश्रमाला मंडळातर्फे धान्य व वस्तू स्वरूपात मदत करण्यात आली.
• स्वप्निल फाऊंडेशन ही संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा कोटबी, ता. डहाणू, जि. पालघर या आदिवासी पाड्यातील शाळेच्या ६७ विध्यार्थ्यांना स्वेटर व खाऊचे वाटप मंडळातर्फे करण्यात आले.
• मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्रीमती एस. के. भाटे माध्यमिक विद्यालय बोरवाडी ता. मालवण जि. रायगड या दुर्गम व डोंगराळ भागात असणाऱ्या विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व क्रीडा साहित्य मंडळातर्फे देण्यात आले.
• स्वातंत्र्य दिन / प्रजासत्ताक दिन मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल सुभद्रा अर्जुन आजगांवकर यांच्या हस्ते व किलबिल नर्सरीच्या विद्यार्थी व पालकांच्या समावेत साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनी आपल्या विभागातील श्री अनिकेत अरुण चिकणे (जनरल ड्युटी टॅंक मॅन, इंडियन आर्मी) यांची प्रमुख उपस्थिती होती.
• विभागीय गोविंदा पथकांस शुभार्शिर्वाद लाभण्यासाठी "चिंतामणी दहीहंडी उत्सव" गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी आयोजित करण्यात आला. गोविंदा पथकांना रोख रक्कम व सन्मान चिन्ह देऊन प्रोत्साहन देण्यात आले.
• लोकमान्य टिळक पुण्यतिथी श्री दयानंद सावंत (पोलीस निरीक्षक, भोईवाडा पोलीस ठाणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या सहकार्याने ग्रंथालयामध्ये साजरी करण्यात आली.
• श्री शिव जन्मोत्सव सोहळा सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ रोजी ढोल ताशांच्या गजरात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात सहभागी किलबिल नर्सरीच्या विद्यार्थ्यांची वेशभूषा विशेष आकर्षण ठरली. संचलनात दिवंगत महादेव व्यायामशाळा, वेतोशी रत्नागिरी यांनी लाठीकाठी, दानपट्टा, ढाल - तलवार यांची प्रात्यक्षिके सादर केली.
• हिंदू नूतन वर्षाचे स्वागत मंडळाचे कोषाध्यक्ष श्री.अमिताभ कौसल्या दशरथ मेस्त्री यांच्या हस्ते मंगळवार दि. ९ एप्रिल २०२४ रोजी चिंतामणी सभागृहात गुढी उभारून करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान, लालबाग - परळ आयोजित हिंदू नववर्ष शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.
• वाचकांसाठी कथा, कादंबरी, नाट्य, चरित्र/आत्मचरित्र, धार्मिक, ऐतिहासिक, आयुर्वेदिक, शास्त्रीय, व्यवसाय मार्गदर्शन, इत्यादी आधारित एकूण ९७५० पुस्तके ग्रंथालयात आहेत. तसेच वृत्तपत्र वाचनालय व अभ्यासिका हे उपक्रम वर्षभर सुरु असतात.
• डि. टी. श्रुती तुम्मा (आहारतज्ञ) नुट्रीशनिष्ट डाएट प्लानर,सुजोक थेरेपिस्ट, हिप्नॉसिस, रेकी.
• डॉ. अतुल डोंगरे (एम.बी.बी.एस.एमडी) त्वचा रोग तज्ञ, केस गळणे.
• डॉ. विनायक ईश्वर पुजारी (एम. डी.) एक्यूप्रेशर, मूळव्याध तज्ञ.
• श्री शशिकांत पवार (पॅथॉलॉजिस्ट)
वरील वैद्यकीय सेवा माफक दरात वर्षभर राबिवली जाते. महिन्याच्या पहिल्या गुरुवारी बॉटली बॉय कंपाऊंड केंद्र व मुंबई महानगरपालिका (सार्वजनिक आरोग्य खाते) यांच्या वतीने बालकांना पल्स पोलिओ डोस व इतर प्रतिबंधक लस दिल्या जातात.
• मंडळाच्या वतीने नर्सरी वर्ग सुरु आहेत. किलबिल नर्सरी अंतर्गत आषाढी एकादशी, स्वातंत्र्य दिन , रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, बालक-पालक यांचा नृत्याविष्कार, दिवाळी, क्रिसमस, मंडई देखाव्याचे सादरीकरण, मकर संक्रांत, प्रजासत्ताक दिन, क्रीडामहोत्सव, शिवजयंती, वार्षिक सहल, होळी, वार्षिक स्नेहसंमेलन हे उपक्रम राबविले जातात.