नवरात्रौत्सव
चिंचपोकळीची आईभवानी · २०२५
आईभवानीचा पाटपूजन सोहळा गुरुवार दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी श्री चिंतामणी सभामंडपात पार पडला. तसेच आईभवानीचा आगमन सोहळा शनिवार दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी ढोलताश्याच्या गजरात पार पडला.
भवानीमातेची घटस्थापना मंडळाचे उपाध्यक्ष श्री वासुदेव सावंत यांच्या हस्ते व श्री दत्तात्रय शास्त्री यांच्या पौरोहित्याखाली करण्यात आली. मूर्तिकार श्री प्रेम कदम यांनी आई भवानीची सुबक मूर्ती घडविली.
- घटस्थापना
- श्री वासुदेव सावंत
- पौरोहित्य
- श्री दत्तात्रय शास्त्री
- मूर्तिकार
- श्री प्रेम कदम
उत्सवाचा प्रवास
- गुरुवार, १६ सप्टेंबर २०२५ पाटपूजन सोहळा श्री चिंतामणी सभामंडप
- शनिवार, २० सप्टेंबर २०२५ आगमन सोहळा ढोलताश्याच्या गजरात
- प्रतिपदा घटस्थापना उपाध्यक्ष श्री वासुदेव सावंत यांच्या हस्ते
- अष्टमी होम हवन
- विजयादशमी सोने लुटण्याचा कार्यक्रम
- बुधवार, ४ ऑक्टोबर २०२५ विसर्जन मिरवणूक "आई भवानी माता"
सांस्कृतिक कार्यक्रम
उत्सव कालावधीत आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम
बालक - पालक नृत्याविष्कार
किलबिल नर्सरी आयोजित बालक - पालक यांचा नृत्याविष्कार संपन्न झाला.
हळदी कुंकू समारंभ
विभागीय महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.
पारितोषिक वितरण
विविध स्पर्धा व शैक्षणिक स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
॥ आई भवानीचा उदो उदो ॥